बापथर : खडकांच्या एका गटाचे नाव. राजस्थानातील जैसलमीर जिल्ह्यामधील बाप या गावाजवळ आर्.डी. ओल्डॅम यांना हा गट १८८६ साली प्रथम आढळला व त्या गावावरून या गोलाश्म-संस्तराला (धोंडयांच्या थराला) हे नाव पडले आहे. यातील काही धोंडे विंध्यकालीन [⟶विंध्य संघ] चुनखडकांचे आहेत, अशी कल्पना आहे. हे थर तालचेर गोलाश्म-संस्तराशी तुल्थ आहेत, असे मानले जाते. [⟶तालचेर माला].

केळकर, क. वा.