मायकेली:मिकली. पश्चिम आशिया मायनरमधील इतिहासप्रसिद्ध भूशिर. हे तुर्कस्तानच्या पश्चिम भागात इजीअन समुद्रकिनाऱ्यावर असून येथे ते ‘सामसून दा’ या नावाने ओळखले जाते.

प्राचीन काळी धार्मिक विचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘आयोनियम राज्यसंघा’  चे  हे  मुख्य  केंद्र  होते.  येथील मौंट मायकेली  (लिडिया)  हे शिखर विख्यात असून मायकेली पर्वतावरील ‘पॉझिडन’ ही सागरदेवता आयोनियनांचे प्रमुख आराध्यदैवतहोते. इ. स. पू. सहाव्या शतकात हा प्रदेश इराणच्या आधिपत्याखाली होता. इ. स. पू. ४७९ मध्ये मायकेलीच्या झालेल्या ग्रीक-इराण युद्धात ग्रीकांनी इराण्यांचा मोठा पराभवकरून इराणचे येथील आरमार नष्ट केले. या पराभवामुळे इराणने माघार घेतली व १० वर्षे चाललेला ग्रीस-इराण संघर्ष संतुष्टात आला. त्यामुळे आशिया मायनरमधील ग्रीकांची इराणी सत्तेपासून सुटका झाली व ग्रीकांच्या इतिहासात मायकेलीला महत्त्व प्राप्त झाले.

चौंडे, मा. ल.