बल्ली : प. बंगाल राज्याच्या हावडा जिल्ह्यातील एक औद्योगिक शहर व कलकत्त्याचे उपनगर. हे ‘बाली’ या नावानेही ओळखले जाते. लोकसंख्या ३८,८९२ (१९७१). बल्ली कलकत्त्याच्या उत्तरेस ८ किमी. व हावड्याच्या ईशान्येस ७ किमी. वर हुगळी नदीच्या पश्र्चिम काठावर वसले आहे. हावड्याशी ते रस्ते व लोहमार्गांनी जोडलेले आहे. येथून कलकत्त्याशी जलमार्गाने लहान नावांतूनही दररोज वाहतूक चालते.

येथे १८८३ पासून नगरपालिका असून ताग, कागद, हाडांची पूड, रासायनिक खते, सुती कापड, विटा, काच, लोखंडी व पोलादी पत्रे बनविणे इ. प्रमुख उद्योग चालतात.

चौंठे, मा. ल.