कर्णप्रयाग: उत्तर प्रदेश राज्याच्या गढवाल जिल्ह्यातील एकतीर्थ क्षेत्र. हे अलकनंदेच्या पाच पवित्र संगमापैकी, पिंडर-अलकनंदा संगमावर, चमोली अथवा लालसंगाच्या नैऋत्येस सु.२०किमी. असून येथे सूर्यपुत्र कर्णा चे मंदिर व आद्य शंकराचार्यांनी स्थापिलेले दुर्गामंदिर आहे. पिंडरनदीवर ६२ मी. व १५५ मी. उंचीची दोन धरणे बांधून विद्युत्‌ निर्मितीची योजना कार्यान्वित केली आहे.

ओक, शा.नि.