कुमामोटो : जपानच्या क्यूशू बेटावरील कुमामोटो प्रांताची राजधानी. लोकसंख्या ४,४७,००० (१९७३). सोळाव्या शतकात येथे भक्कम किल्ला उभारला गेल्याने यास महत्त्व आले. हे शिराकावा नदीकाठी, टोकिओच्या ८९६ किमी. नैर्ॠत्येस आहे. समृद्ध कृषिप्रधान आसमंतात वसल्याने ही मोठी व्यापारी पेठ बनली असून, येथे कापडगिरण्या व अन्नप्रक्रिया यांचे कारखाने आहेत. यांशिवाय येथे वैद्यकीय विद्यापीठ, अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था आहेत.

शाह, र. रू.