काचरापारा : पश्चिम बंगालच्या चोवीस परगणा जिल्ह्यातील औद्योगिक केंद्र. लोकसंख्या ७८,७६८ (१९७१). हे कलकत्त्याच्या ईशान्येस ४१ किमी., हुगळीच्या किनारी आहे. येथे तागाच्या गिरण्या व पूर्व रेल्वेची मोठी कर्मशाळा आहे.

ओक, शा. नि.