फ्रीटाउन : आफ्रिकेतील सीएरा लेओन देशाची राजधानी . लोकसंख्या ३ , १४ , ३४० ( १९७४ ), अटलांटिक महासागरावरील सीएरा लेओन नदीमुखावरील सुरक्षित व खोल असे हे सर्वोत्तम नैसर्गिक बंदर असून देशातील प्रमुख शहरांशी ते लोहमार्ग व सडका यांनी जोडलेले आहे . लुंगी हा आंतरराष्ट्रीय विमानतळ सीएरा लेओन नदीपलीकडे असून देशांतर्गत वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा हेस्टिंग्ज विमानतळ शहरापासून सुमारे १६ किमी. वर आहे .
गुलामगिरी विरोधी चळवळीच्या पुरस्कर्त्यांनी इंग्लंडहून १७८७ मध्ये पाठविलेल्या स्वतंत्र आ फ्रिकी गुलामांच्या वसाहतीसाठी या शहराची निवड करण्यात आली . १७९४ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीकारकांकडू न हे लुटण्यात आले . १८९३ मध्ये येथे नगरपालिका स्थापन झाली . एकोणिसा व्या – विसा व्या शतकांत व्यापार आणि लष्करी दृष्ट्या सोयीचे असल्यामुळे या शहराचा विकास झाला . दुसऱ्या महायुद्धात येथे नाविक तळ होता . आंतरराष्ट्रीय सागरमार्गावरील जहाजांचे इंधनस्थानक म्हणूनही हे महत्त्वाचे आहे .
या बंदरातून मुख्यतः ताडतेल , ताडगर , ताडतंतू ( पसाव्हा ) , आले , कोलानट , कोको , कॉफी वगैरे माल तसेच प्लॅटिनम , हिरे , निर्यात केले जातात . शिवाय शहरात मासे डबाबंद करणे , अन्नप्रक्रिया , साबण , मद्यनिर्मिती , पादत्राणे सिगारेटी , हिऱ्यांना पैलू पाडणे वगैरे अनेकविध व्यवसाय चालतात . शहरात शासकी य कार्यालये व लष्करी तळ असून अनेक मशिदी व चर्च आहेत . त्यांपैकी अँग्लिकन सेंट जॉर्ज कॅथीड्रल प्रसिद्ध आहेत . सिएरा लेओन विद्यापीठ ( स्था . १९६७ ) येथे असून फोरा बे महाविद्यालय , फ्री टाउन शिक्षक महाविद्यालय , तंत्रविद्यालय इ . शैक्षणिक संस्था येथे आहेत . येथील राष्ट्रीय संग्रहालयात ऐतिहासिक कागदपत्रे आणि पारंपारिक काष्ठशिल्पे व शिळाशिल्पे यांचे जतन केलेले आहे .
लिमये , दि . ह .