फ्रँकफुर्ट  : पश्चिम जर्मनीच्या हेस प्रांतातील मेन नदीकाठी वसलेली इतिहासप्रसि द्ध शहर. लोकसंख्या ६,३२,६००  ( १९७७ ). देशांतर्गत बंदर, दळणवळण केंद्र तसेच सांस्कृतिक महत्त्वा चे शहर म्हणूनही ते विख्यात आहे. हे डार्मस्टाटच्या उत्तरेला सु .  २६ किमी. आणि व्हीस्बाडेनच्या पूर्वेला सु. १९ किमी. अंतरावर वसले आहे.

 हे मूळचे रोमनकालीन शहर आठव्या शतकातील सम्राट शार्लमेनच्या काळात राजघराण्याचे निवासस्थान बनले. पलॅटिनॅट (प्फात्स) किल्ल्याभोवती प्रथम हे शहर वसविले गेले आणि शहराला तटबंदी घालण्यात आली. पवित्र रोमन साम्राज्याच्या सम्राटांना पोपकडून  फ्रँ कफुर्ट कॅथीड्रलमध्येच  राज्याभिषेक हो ऊ लागल्याने ( १५६२ – १७९२ ) या शहराचे मह त्त्व अधिकच वाढले. ⇨ फ्रँ को – प्रशियन  ( जर्मन )  यु द्धा चा  ( १८७०–७१ )  शेवट येथील तहामुळेच  ( १० मे १८७१ )  झाला .  दुस ऱ्या महायु द्धा त अनेकदा या शहरावर बाँ बवर्षाव झाल्यामुळे  अनेक वास्तू उद्‌ध्वस्त झाल्या. मात्र  १९४५ नंतर जुन्या इमारतींची दुरुस्ती व आधुनिक  वास्तूंची  उभारणी यांमुळे शहराला नवीनच  रू प  प्राप्त झाले.

 मेन नदीकाठावरील फ्रँकफुर्ट शहराचे दृश्य

 

 तेराव्या शतकापासून व्यापार आणि परराष्ट्रीय संबंध यांसाठी प्रसि द्ध असलेल्या या शहरात औष धे , रसायने, यंत्रसामग्री, विद्युत्‌ उपकरणे, सूक्ष्म उपकरणे, कातडी वस्तू, कापड, मो टा री  व त्यांचे सुटे भाग, धातूंची  भां डी  यांसारखे नानाविध उद्योगधंदे चालतात. मध्ययुगापासून जागतिक व्यापारी जत्रांसाठी या शहराची ख्याती असून यू रो पातील  नामांकित व्यापारी त्यांत भाग घेतात. येथे प्रसि द्ध आंतरराष्ट्रीय पुस्तक जत्राही भरते.

 फ्रँ कफुर्टमधील  जुन्या वास्तू प्रेक्षणीय असून त्यांत चर्च व कॅथीड्रल यांचा समावेश होतो. त्यांपैकी ‘द गॉथिक चर्च ऑफ सेंट बार्थोलोम्यू’ (तेरावे-पंधरावे शतक), सेंट पॉलचे ल्यूथेरियन चर्च प्रसि द्ध आहेत. स्टाडेल चित्रसंग्रहालयात पंधराव्या ते अठाराव्या शतकांतील नामवंत यूरोपीय चित्रकारांची चित्र संग्रहित केलेली आहेत. योहान व्होल्फगांग गटे विद्यापीठ (स्था.  १९१४ ) येथेच आहे. यांशिवाय कला अकादमी, वाचनालये व संग्रहालये, वेस्ट जर्मन सेंट्रल बॅंक इ. अनेक संस्था शहरात आहेत. सुप्रसि द्ध जर्मन कवी गटे याचे हे जन्मस्थान, तर विख्यात  तत्त्व वेत्ता  शोपेनहौअर याचे हे निवासस्थान होय. व्यापारउद्योगांना भांडवल पुरविणारे प्रसि द्ध रोद्‌शिल्ट  (रॉथ्सचाइल्ड) हे ज्यू घराणेही येथेच उ दया स आले.

 शहाणे, मो.  ज्ञा .