फ्रिझियन बेटे : यूरोपच्या वायव्येस उत्तर समुद्रात पसरलेली द्वीपमालिका . ही नेदर्लंड्समधील नॉर्थ हॉलंड प्रांताच्या उत्तर टोकापासून डेन्मार्कच्या मांदर बेटापर्यंत पसरली आहे . नेदर्लंड्स , प . जर्मनी यांच्या उत्तर व डेन्मार्कच्या प . किनाऱ्याला ही रांग समांतर असून किनाऱ्यापासून तिचे अंतर सु . ५ ते ३२ किमी . आहे . या रांगेचे पश्चिम , पूर्व व उत्तर फ्रिझियन बेटे असे तीन भाग अनुक्रमे नेदर्लंड्स , प . जर्मनी व डेन्मार्क यांच्या आ धिपत्याखाली येतात .
सागरी लाटा आणि वादळ यांच्या सतत होणाऱ्या क्षरण – क्रियेमुळे मुख्य भू मीची वाळूची किनारपट्टी वेगळी होऊन ही बेटे निर्माण झाली . यां तील पश्चिम व पूर्व फ्रिझियन बेटांचा विस्तार इ . स . चौथ्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंतच्या काळात झाला . या बेटांचा पृष्ठभाग समुद्रसपाटीपासून फार उंच नसल्याने समुद्राच्या लाटांमुळे त्यांचे बरेच नुकसान होते . १३६२ , १५७० व १६३४ मध्ये झालेल्या वादळांमु ळे यांतील बऱ्याच बेटांचे आकार खूपच बदलले व बराचसा भूभागही नष्ट झाला . ही द्वीपमालिका प्रथम नेदर्लंंड्सच्या वायव्य किनाऱ्यापासून बहिर्गोलाकृती वळण घेऊन पूर्वेस प . जर्मनीच्या किनाऱ्याने एल्ब नदीमुखापर्यंत सलगपणे पसरते व नंतर उत्तरेस वळून तुटकतुटक भागांनी प . जर्मनीच्या श्ले स्विग – होल्स्टाईन प्रांताच्या किनाऱ्याने पुढे डेन्मार्कच्या जटलंड द्वीपकल्पाच्या किनाऱ्यापर्यंत पसरते . बेटांवरील हवामान थंड पण सतत ढगाळ पावसाळी असते . प श्चि मी वाऱ्यांमुळे वर्षभर पाऊस पडतो . वाळूमिश्रीत जमीन व जोरदार वारे यांमुळे बेटांवर मोठ्या वनस्पतींची वाढ होत नाही . उत्तम प्रतीची चराऊ कुराणे मात्र भरपूर आहेत , त्यांमुळे गुरांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते . ‘ फ्रिझियन गाई ’ जगप्रसिद्ध आहेत . काही भागांतील अल्पशा सुपीक जमिनीत राय , ओट , बटाटे इ . पिके घेतली जातात . यांशिवाय येथे मासेमारी , मेंढ्या पाळणे हेही मुख्य व्यवसाय आहेत . काही बेटांवर पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने सुधारणा केल्या जात आहेत . बहुतेक बेटांवर जाण्यासाठी लहान बोटींचाच वापर करावा लागतो .
पश्चिम फ्रिझियन बेटे : नेदरर्लंड्च्या उत्तरेस पूर्व – पश्चिम दिशेने पसरलेल्या या द्वीपसमूहातील बऱ्याच बेटांवर लोकवस्ती आढळते . लोकसंख्या २० , ८०० ( १९७२ अंदाज ). या बेटांमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक बांधामुळे नेदर्लंड्सचा मुख्य भूभाग व ही बेटे यांदरम्यान ‘ व्हाडंझी ’ हा उथळ समुद्र निर्माण झाला आहे . या द्वीपसमूहात टेसल ( क्षेत्रफळ १६६ चौ . किमी .) , व्ह्लीलांट ( ३१ चौ . किमी .) , टेर्स्कहेलिंग ( ९६ चौ . किमी .) , आमलांट ( ५७ चौ . किमी .) , स्खी र्माॅ निकोख ( २६ चौ . किमी .) इ . महत्त्वा ची बेटे असून रॉटमरोख ( ३· ८ चौ . किमी .) , सीमोन्सांट , बोस्प्लाट , रॉटमेरप्लाट इ . निर्मनुष्य बेटांचाही यात समावेश होतो . यांपैकी टेसल ह्या सर्वांत मोठ्या बेटाच्या उत्तरेकडील आयर्लांट पोल्डर हा भाग समुद्रपक्ष्यांचे पोषणकेंद्र आहे . डेन बर्ग हे येथील प्रमुख शहर असून बेटावरील एकूण वसाहतीच्या एक – तृतीयांश लोकसंख्या या शहरात आहे . आउडेस्चाइल्ड हे या बेटावरील छोटे मच्छीमारी बंदर असून नेदर्लंड्सच्या मुख्य भूमीशी तेथूनच छोट्या बोटींतून वाहतूक चालते .
पूर्व फ्रिझियन बेटे : प . जर्मनीच्या उत्तर किनाऱ्यालगत एम्स नदीमुखखाडीपासून पूर्वेस एल्ब नदीमुखापर्यंत पसरलेली बेटे . लोकसंख्या १९ , ७०० ( १९७० अंदाज ). ही बेटे प . फ्रिझियन द्वीपसमूहातील बऱ्याचशा बेटांपेक्षा आकाराने लहान आहेत . यांतील बॉर्कुम ( क्षेत्रफळ ३६ चौ . किमी .) , यूस्ट ( १७ चौ . किमी .) , नॉर्डर्नाई ( २३ चौ . किमी .) , बाल्टुम ( ७ · ७ चौ . किमी .) , लांगओक ( १८ चौ . किमी .) , स्पी करोक ( १४ चौ . किमी .) व व्हांगरोग ( ७ चौ . किमी .) या प्रमुख सात बेटांवरच थोड्याफार प्रमाणात शेती केली जाते व तेथेच लहान गावे आढळतात . नॉईव्हेर्क ( २ · ५ चौ . किमी .) या बेटावर दीपगृह असून त्याची देखभाल करणारे व नावाडी यांचीच तेथे वस्ती आहे . शा र्ह र्न ( ५ चौ . किमी .) हे निर्मनुष्य बेट आहे . उन्हाळ्यात यांतील मुख्य बेटांना पर्यटक भेट देतात . बॉर्कुम व नॉर्डर्नाई ही बेटे उत्तर समुद्रातील महत्त्वाची पर्यटनस्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत . या बेटातील अंतर्गत वाहतुकीसाठी छोट्या रेल्वेचा व जर्मनीच्या मुख्य भूभागाशी दळणवळणासाठी लहान बोटींचा उपयोग केला जातो .
उत्तर फ्रिझियन बेटे : एल्ब नदीमुखखाडीच्या उत्तरेस ट्रिशन बेटापासून मांदर बेटापर्यंत पसरलेली ही बेटे प . जर्मनी व डेन्मार्क यांच्या त विभागलेली आहेत . लोकसंख्या जर्मन ३८ , ४०० ( १९७० अंदाज ) डेन ३ , ७०० ( १९६५ ). १६३४ पर्यंत या समूहातील नॉर्टश्ट्रांट व पेल्व्हॉर्म ही दोन्ही बेटे एकमेकांस जोडलेली होती . या बेटांच्या उत्तरेकडील इतर बेटेही एका अखंड भूभागाचे अवशेष आहेत . आम्रुम ( क्षेत्रफळ २१ चौ . किमी .) , फर ( ७८ चौ . किमी .) , नॉर्टश्ट्रांट ( ४५ चौ . किमी .) , पेल्व्हॉर्म ( ३६ चौ . किमी .) , झिल्ट ( ९३ चौ . किमी .) , हेल्गोलँड ( ६० हेक्टर ) , ट्रिशन इ . प . जर्मनीच्या ताब्यातील व फान ( ५७ चौ . किमी .) , मांदर ( ६ चौ . किमी .) , रम ( १०१ चौ . किमी .) इ . डेन्मार्कच्या ताब्यातील बेटांचा या द्वीपसमूहात समावेश होतो . १९२० पूर्वी यांतील डेन्मार्कची बेटे प्रशियाच्या ताब्यात होती . डेन लोकांनी समुद्र हटविण्याची जोरदार मोहीम हाती घेतली असून ही बेटे व मुख्य भूभाग यांदरम्यान ‘ व्हाडं ’ ( पोल्डर – समुद्र हटवून तयार केलेली जमीन ) तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत . रम आणि झिल्ट ही बेटे मुख भूभागाशी बंधाऱ्याने जोडण्यात आली आहेत . त्यामुळे झिल्ट बेट व मुख्य भूभाग यांच्यात रेल्वेवाहतूक शक्य झाली आहे . या बेटावर अनेक पर्यटनस्थळे असून काइटुम हे त्यांतील प्रमुख शहर आहे .
येथील रहिवासी मूळच्या जर्मानिक वंशाचे आहेत . या तीनही द्वीपसमू हां तील बोलीभाषांचे इंग्रजी भाषेशी बरेचसे साम्य आढळते .
डिसूझा , आ . रे . चौंडे , मा . ल .
“