फ्रँक्लिन , सर जॉन : ( १६ ए प्रिल १७८६ – ११ जून १८४७ ). ब्रिटीश समन्वेषक व नौदल अ धि कारी . अटलांटिक व पॅसिफिक महासागरांना जोडणा ऱ्या ‘ नॉथवेस्ट पॅसेज’ चा एक संशोधक . लिंकन शर मधील स्पिल्स्बी येथे जन्म . प्राथमिक शिक्षणानंतर वयाच्या चौदाव्या वर्षी च त्याने नावि क आयुष्याला सुरवात केली . १८०१ मधील कोपनहेगनच्या लढाईत याने भाग घेतला . त्यानंतर ऑस्ट्रे लियन किनाऱ्याच्या समन्वेषणाक रिता मॅथ्यू फ्लिं डर्झ याच्याबरोबर तो गेला होता परंतु १८०३ मध्ये बोट फुटल्याने त्याला इंग्लं डला परतावे लागले . २१ ऑ क्टो बर १८०५ रोजी झालेल्या ट्रफॅल्गरच्या लढाईत फ्रँक्लिनने भाग घेतला होता . त्यानंतर १८०८ मध्ये त्याला ले फ्ट नंट हा हु द्दा मिळाला . १८१८ मध्ये डेव्हिड बुचनच्या नेतृत्वाखालील उ . ध्रु वाच्या मोहिमेत फ्रँक्लिनने भाग घेतला . या मोहिमेत बुचनची बोट नष्ट झाल्याने समन्वेषणाचे काम अपुरेच राहिले , मात्र फ्रँक्लिनला ध्रुव प्रदेशाचा उत्तम अनुभव मिळाला . त्यानंतर १८१९ – २२ या काळात त्याने आ र्क्टि क प्रदेशातील आपल्या नेतृत्वाखालील पहिली मोहीम काढली . या मोहिमेत फ्रँक्लिनला कॅनडाच्या उत्तर किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रथम ग्रेट स्लाव्ह सरोवरापासून उत्तरेस कॉपरमाइन नदीमुखापर्यंतचा ओसाड प्रदेश ओलांडावा लागला. कॉपरमाइन नदीमुखापासू न पूर्वेस सु . २८० किमी . किनाऱ्याचे त्याने समन्वेषण केले . १८२२ मध्ये तो इंग्लडला परतला . त्याने या प्रवासाचा वृत्तांत नॅरटिव्ह ऑफ ए जर्नी टू द शोअर्स ऑफ द पोलर सी या नावाने प्रसिद्ध केला ( १८२३ ). त्याच वर्षी त्याचे ल ग्न झाले . १८२५ मध्ये पत्नी मृत्युशय्ये वर असतानाच त्याला पुन्हा अमेरिकेत जाण्याचा हु कूम आला . १८२५ – २७ मधील मोहिमेत त्याने उत्तर कॅनडाच्या ध्रुव प्रदेशाचे उत्तम सर्वेक्षण केले . यावेळी त्याने मॅ केंझी नदीमुखापासून पश्चिमेस अलास्कामधील पॉइंट बॅरोपर्यंत व पूर्वेस कॉपरमाइन नदीमुखापर्यंतच्या ऑर्क्टिक किनाऱ्याचे संशोधन केले . या दोन्ही मोहि मांत मिळून त्याने आज्ञात अशा एकूण १ , ९२० किमी . किनारी प्रदेशाचे समन्वेषण केले . पुढे तो कॉपरमाइन नदीतून ग्रेट बेअर सरोवरापर्यंत गेला . सरोवराकाठी त्याने ‘ फोर्ट फ्रॅं क्लि न ’ हा किल्ला बांधला व १८२७ मध्ये तो इंग्लं डला परतला. या मोहिमेचा वृत्तांत त्याने नॅरटिव्ह ऑफ ए सेकंद ए क्स्पि डिशन टू द शोअर्स ऑफ द पोलर सी याद्वारा १८२८ मध्ये प्रसिद्ध केला . त्याच वर्षी त्याचे दुसरे लग्न झाले . १८२९ मध्ये त्याला ‘ सर’ हा किताब मिळाला . टास्मानियाचा ग व्हर्न र म्हणूनही त्याची नेमणूक करण्यात आली ( १८३६ – ४३ ).
फ्रँक्लिनने १८४५ मध्ये आर्क्टि क प्रदेशच्या समन्वेषणासाठी पुन्हा प्रया ण केले . यावेळी ‘ नॉथवेस्ट पॅसेज ’ शोधण्याचा त्याचा हेतू होता . ‘ एरे बस’ व ‘ टेरर ’ नावाची दोन उत्तम गलबते , शि धासामग्री , सर्व प्रकारची यंत्रसामग्री , अनुभवी माणसे अशा तयारीने तो गेला होता . २५ व २६ जुलै १८४५ रोजी त्याला देवमाश्यांची शिकार करणाऱ्या स्कॉटिश मच्छिमाऱ्यां नी पाहिले होते . त्यानंतर या तुकडीचे काय झाले ते कोणालाच कळले नाही . त्यांच्या शोधार्थ एकूण चाळीस वेळा प्रयत्न झाले . अलास्काच्या उत्तरेस बीची बेटावर फ्रॅंक्लिनने वास्तव्य केल्या चे काही पुरावे मिळाले . १८५३ – ५४ मध्ये डॉ . रे व नंतर १८५७ व ५९ मध्ये कॅ . मॅक्लिं टन यांनी याबाबत खूप माहिती मिळविली . त्यांना किंग विल्यम बेट व लॅंकास्टर साउंड भागांत गलबताचे अवशेष, मृत शरीरे व २५ एप्रि ल १८४८ पर्यंतच्या समन्वेषणाविषयीचे कागदपत्र मिळाले . या माहितीनुसार व या भागातील ए स्किमोंकडून सम ज लेल्या हकीकतीनुसार पुढील माहि ती उपलब्ध झाली : फ्रॅंक्लि नची जहाजे व्हि क्टो रिया बेट व किंग विल्यम बेट यां दरम्यान बर्फात अडकून पडली . १८४७ मध्ये फ्रँक्लिन मृत्यू पावला . १८४८ मध्ये इतर लोक पायीच दक्षि णेकडे निघाले परंतु त्यांपैकी एकही फार काळ जिवंत राहिला नाही . फ्रॅंक्लिन च्या समन्वेषणांत गोळा केलेल्या माहितीची कागदपत्रे व त्याची रोजनिशी शोधण्याचा १९६० मध्येही प्रयत्न करण्यात आला .
शाह , र . रू . चौडे , मा . ल .
“