फोटॉन  : विद्युत्   चुंबकीय ऊर्जेच्या अविभाज्य व अत्यल्प मूल्य असलेल्या एका कणाला अथवा पुंजकणाला फोटॉन असे म्हणतात .  फोटॉनाशी संबंधित असणाऱ्या प्रकाश तरंगाची कंप्रता  ( एका सेकंदात होणाऱ्या कंपनांची संख्या )  जर  v असेल ,  तर फोटॉनाची ऊर्जा h  v एवढी असून त्याचा संवेग h  v /c एवढा असतो  (h =  माक्स प्लांक यांचा विश्व स्थिरांक व c  =  निर्वातातील प्रकाशवेग ).  प्रकाशाचे वरील कण स्वरूप गृहीत धरले ,  तर ⇨  कॉ म्पट न परिणाम ,  ⇨  प्रकाश वि द्यु त् व तत्सम आविष्का रां चे स्पष्टीकरण देता येते .  व्यतिकरण इ .  प्रकाशीय आविष्कारांचे विशदीकरण करण्याकरिता प्रकाशाचे तरंग स्वरूप लक्षात घ्यावे लागते  [⟶ प्रकाश प्रकाशकी ].  आधुनिक विद्युत्   गतिकीमध्ये  ( विद्युत् ,  चुंबकीय व यांत्रिक आविष्कारांमधील संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्‍त्रामध्ये )  विशिष्ट तरंगलांबी ,  वेगदिशा व ध्रुवीकरण या राशींनी फोटॉनाचे संपूर्ण स्वरूप निश्चित केले जाते ,  असे मानून लँ ब स्थानच्युती  ( डब्ल्यू .  ई .  लँ ब या भौतिकीवि ज्ञां च्या नावाने ओळखण्यात येणारा आणवीय भौतिकीतील आविष्कार )  इ .  आविष्कारांची मीमांसा दिली जाते . [⟶  पुंजयामिकी पुंज सिद्धांत ].

 शिरोडकर ,  सु . स .