फोग : ह्या वनस्पतीची फोग , फोगल्ली , फोक , तिरनी इ . नावे सिंधी व पंजाबी भाषांतील असून कॅलि गो नम पॉलिगो नॉ इड् स ह्या शास्त्रीय नावाने ती ओळखली जाते . फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति , आवृ त बीज उपविभाग ] द्विदलिकित वर्गातील चुका कुलात हिचा अंतर्भाव असून भारतात ( महाराष्ट्र , पंजाब व राजस्थान ) व इराण , आर्मेनिया , सिरिया , सिंध व बलुचिस्तान इ . प्रदेशांत तिचा प्रसार झालेला आहे . कॅलिगोनम वंशात एकूण सु . ७५ जाती असून भारतात फोग ही एकच जात आढळते . ही जवळजवळ पर्णहीन झुडपासारखी आणि ताठ र असून हिच्या फांद्या शूलाकृती ( लांब व टोकदार ), फिकट व गुळगुळीत असतात उपप र्णे आ खू ड , पातळ , पेल्यासारखी असतात . फु लां चे देठ १·५ – २ ·५ मिमी . लांब असून लालसर फुले ( ३ मिमी . लांब ) बारीक फांद्यांवर एप्रिल ते मेमध्ये उप पर्णां च्या बगलेत झुबक्यांनी येतात . फळ लहान ( ६ – ८ मिमी . लांब ), कठीण , चौधारी व परिदलवेष्टित कपाली ( जाड कवचाचे शुष्क व एकबीजी ) असून त्यावर तांबूस केस असतात [ ⟶ फळ ]. हिची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ पॉलिगोनेसी कुलात ( चुका कुलात ) वर्णिल्याप्रमाणे असतात . हिची मुळे ठेवून काताबरोबर उकळून तो रस सुजलेल्या हिरड्यांवर गुळण्या करण्यास देतात . फुलात प्रथिन भरपूर असते . फुले व कळ्या को शिं बिरी त घालतात तसेच त्यांची भाकरी करतात किंवा फुले तुपात किंवा तेलात तळून खातात .
संदर्भ : Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. III, Delhi, 1975 .
जमदाडे , ज . वि .
“