अमेरिका: पश्चिम गोलार्धातील उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका या सर्व भूभागांना असलेले नाव. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनाही बऱ्याच वेळा ‘अमेरिका’ असेच संबोधिले जाते. आमेरीगो व्हेसपूची (१४५१–१५१२) या इटलीच्या समन्वेषकावरून या भागास अमेरिका हे नाव मार्टिन व्हाल्टझेम्यूलर याने १५०७ मध्ये आपल्या ग्रंथात दिले. व्हाल्टझेम्यूलरला तोपर्यंत कोलंबसच्या प्रवासाची माहिती नव्हती. व्हाल्टझेम्यूलरची पुस्तके त्या वेळेस यूरोपात प्रसिद्ध असून प्रमाण मानली जात म्हणूनच त्या भागाला अमेरिका हेच नाव पुढे रूढ झाले.
पहा : अमेरिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
शाह, र. रू.