उमताली: ऱ्होडेशियातील उमताली प्रांताची राजधानी. लोकसंख्या ९,४०० यूरोपीय, ४२,००० आफ्रिकन व १,००० इतर (१९७२). हे सॉल्झबरीच्या आग्नेयीस २१६ किमी., ऱ्होडेशियाच्या पूर्व सरहद्दीवर असून सॉल्झबरी ते बेइरा बंदर यांना जोडणाऱ्या लोहमार्गावर आहे. उमतालीच्या परिसरात सोन्याच्या खाणी असून येथे रेल्वे-कर्मशाळा, लाकूड कापणे, आटा, कपडे, मुरंबे, तंबाखू इ. उद्योग आहेत.

लिमये, दि. ह.