अटलँटिस : भूमध्य समुद्राच्या किनाऱ्‍यालगतच्या देशांत प्राचीन काळी प्रचलित असलेल्या दंतकथांत ‘अटलँटिस’ नावाच्या एका बेटाचा उल्लेख आहे. ते बेट जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेस असलेल्या महासागरात होते व तेथील रहिवाशांनी अथेन्सशी युद्ध करण्याचे पाप केल्याबद्दल दैवी शिक्षा म्हणून सु. नऊ हजार वर्षांपूर्वी ते सागरात बुडाले, अशी ईजिप्तमधील पुरोहितांकडून कळलेली दंतकथा प्लेटोच्या द टिमियस अँड द फ्रीटस या ग्रंथात आहे. अटलँटिसच्या स्थानाविषयी अनेक कल्पना सुचविण्यात आलेल्या आहेत पण त्याच्या स्थानाविषयी किंवा अस्तित्वाविषयी पुरावा मिळालेला नाही.

केळकर, क. वा.