अवधी : ‘हिंदी’ या सामान्य नावाने ओळखल्या जाणार्‍या भाषासमूहातली अवधी ही एक महत्त्वाची भाषा आहे. अवधी म्हणजे अवधची भाषा. अवध म्हणजे ‘औध’ या नावाने आज ओळखला जाणारा, प्राचीन काळी ‘अयोध्या’ हे नाव असलेला प्रदेश. मात्र अवधी म्हणजे सर्व अवधभर बोलली जाणारी एकमेव भाषा नसून ते एका विशिष्ट लक्षणांनी युक्त अशा भाषेचे नाव आहे. अवधच्या हरदोई जिल्ह्यात आणि खेरी व फैजाबाद यांच्या काही भागांत ती बोलली जात नाही, तर याउलट अवधबाहेर आग्रा प्रांताच्या फतेपूर, अलाहाबाद, जौनपूर व मिर्झापूर या जिल्ह्यांत ती पसरलेली आहे. ती ‘पूर्बी’ व ‘कोसली’ या नावांनीही ओळखली जाते.

अवधीच्या पश्चिमेला कनौजी व बुंदेली, पूर्वेला भोजपुरी (बिहारी), दक्षिणेला छत्तीसगढी आणि उत्तरेला नेपाळी या भाषा आहेत.

अवधी हा पश्चिम हिंदी व बिहारी यांच्यातला दुवा आहे. पश्चिम हिंदीत नामांची रूपे आखूड असतात, बिहारीत ती दीर्घ व दीर्घतर असतात, तर अवधीत ती आखूड व दीर्घ आढळतात.

ऐतिहासिक दृष्ट्या अवधी ही एक भारतीय आर्य भाषा, म्हणजे संस्कृत किंवा तिला जवळ असणारी एखादी बोलभाषा हे जिचे मूळ आहे, अशी भाषा आहे. एखाद्या विशिष्ट प्राकृत भाषेशी तिचे नाते जोडण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे कारण प्राकृत भाषांचे नामकरण अतिशय फसवे असून नव आर्य भाषांच्या इतिहासाला त्यामुळे फारशी मदत होत नाही. ग्रांथिक किंवा व्याकरणात वर्णन केलेली प्राकृत आधुनिक आर्य भाषांचा समाधानकारक खुलासा करायला बऱ्याच अंशी असमर्थ ठरते. म्हणून या भाषांचा इतिहास ग्रंथनिर्मितिकाळापासूनच अधिक स्पष्टपणे सांगता येतो.

ध्वनिव्यवस्था : अवधीत पुढील ध्वनी आहेत :

व्यंजने:

.

.

.

.

.

.

न्ह

म्ह

.

.

.

ऱ्ह

ल्ह

.

.

.

.

(वि.सू. न्ह, म्ह, र्हस, ल्ह ही संयुक्त व्यंजने नसून स्वतंत्र महाप्राणयुक्त व्यंजने आहेत.)
स्वर :
सर्व स्वरांची अनुनासिक रूपेही होतात.

रूपविचार : रूपविचाराची वैशिष्ट्ये वर्गवार पुढीलप्रमाणे आहेत

नाम : नामात पुल्लिंग व स्त्रीलिंग ही दोन लिंगे, एकवचन व अनेकवचन आणि प्रत्यक्ष व सामान्य या दोन विभक्ती आढळतात.

लिंग परंपरागत आहे. अर्थावरून किंवा प्रत्ययावरून ते नेहमीच निश्चित होते, असे नाही.

व्यंजनान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘उ’ हा प्रत्यय लागून आणि व्यंजनान्त स्त्रीलिंगी नामाचे ‘अइ’ हा प्रत्यय लागून होते. स्वरान्त नामांच्या अनेक-वचनाचे रूप एकवचनासारखेच असते.

नामाचे मूळ एकवचनाचे व अनेकवचनाचे रूप किंवा अचेतन प्रत्यक्ष कर्म म्हणून वापरले जाते. ही प्रत्यक्ष विभक्ती. सामान्य विभक्ती

तुइ, अ. व

महि हम

तुहि तुम

ए. व

मोर

तोर

अ. व

हमार

तुमार

सामान्य रूप
पु. उ

स्त्री. वा,

वहु }

वह }

उइ, वहि उइ उन उन्ह

यांशिवाय इतर सर्वनामे पुढीलप्रमाणे :

दर्शक : ए. व. (पु.) इउ, ज़हु (स्त्री.) जा, जह अ. व. ई सा. रूप (ए. व.) ई, एहि (अ. व.) इन, इन्ह

संबंधी : (ए. व.) जो, जौन (अ. व.) जो, जौन, जी सा. रूप (ए. व.) जी, जेहि (अ. व.) जिन, जिन्ह

सापेक्ष : (ए. व.) सो, तौन (अ. व.) सो, तौन, ती सा. रूप : तिन, तिन्ह

प्रश्नवाचक : (सचेतन) को, कौन सा. रूप (ए. व.) की, केहि (अ. व.) किन, किन्ह (अचेतन) का सा. रूप : काहे, केहि

स्ववाचक : अपना.

क्रियापद : क्रियापदात विध्यर्थ, आज्ञार्थ व संकेतार्थ हे तीन प्रकार आणि वर्तमान, भूत व भविष्य हे तीन काळ आहेत. क्रियावाचक नामाच्या अंती येणारा बु-अबु-वबु हा प्रत्यय काढून घेतल्यावर उरणारे रूप धातूचे मानता येते :

नामे : होबु, करबु, वजावबु धातू-हो-, कर-, बजा-.

देख– या धातूची काही रूपे नमुन्यासाठी खाली दिली आहेत :

ए. व.

अ. व.

वर्तमानकाळ

१ देखउं

२देखइ

३ देखइ

१देखी

२ देखउ

३ देखइ

भविष्यकाळ

देखेउं

देखे, देखिसि

देखिसि

देखेन

देखेउ

देखिनि

भविष्यकाळ

देखिहउं

देखिहइ

देखी

देखिबा, देखिब

देखिहउ

देखिहइं

वरील थोडक्याच वर्णनावरून प्रमाण हिंदी व अवधी यांच्यातले अंतर स्पष्ट होईल.

शब्दभांडार : बहुसंख्य शब्द संस्कृतोद्भव आहेत. आर्येतर भाषांतील काही अंश क्वचित सापडतात. बोलभाषेत कायस्थ लोक सामान्यपणे फार्सी शब्द अधिक वापरतात, तर ब्राह्मणांच्या भाषेत संस्कृतचे प्रमाण आधिक आहे.

लिपी : अवधीचे लेखन सामान्यतः कैथी (कइथि) या लिपीत होते. पण व्यापारी लोक मुडिया लिपी वापरतात. या दोन्ही लिपी देवनागरीचीच रूपे आहेत. सुशिक्षित अवधी भाषिक मात्र देवनागरी किंवा उर्दूचा वापर करतात.

अवधीचा नमुना : एक राजा रहइ अउ महतारी रहइ अउ दुलहिन रहइ. महतारी रोजु छप्पन परकाल के भोजन बनावइ अउ अपना खाइ अउ अपने लरिक क खवावइ.

भाषांतर : एक होता राजा आणि (एक) होती आई आणि (एक) होती बायको.

आई रोज छप्पन प्रकारचे अन्न बनवून आणि स्वतः खाऊन आणि आपल्या मुलाला खाऊ घालायची.

साहित्य : अवधीचे साहित्य बाराव्या शतकापासून सुरू झाले. जगनिक  कवीने लिहिलेले आल्हखंड हे या भाषेतले पहिले काव्य असून ते ११७४ मधले आहे. चौदाव्या शतकात उसळलेल्या भक्तियुगाच्या लाटेत विपुल प्रमाणात संतकाव्य निर्माण झाले. यापैकी सर्वांत प्रसिद्ध काव्य तुलसीदासाचे रामचरितमानस आहे. याशिवाय अनेक प्रेमाख्यानेही लिहिली गेली असून त्यांत हिंदूं प्रमाणेच सूफींचाही वाटा मोठा आहे.

पहा : हिंदी भाषा.

संदर्भ : 1. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. VI, Delhi, 1968.

2. Saksena, Baburam,Evolution of Awadhi (A Branch of Hindi), Alahabad, 1938.

कालेलकर, ना. गो.