अणुक्रमांक : मूळ कल्पनेप्रमाणे अणुक्रमांक म्हणजे मूलद्रव्यांचा ⇨ आवर्त सारणीमधील क्रमांक, परंतु प्रचलित व्याख्येनुसार अणुक्रमांक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या किंवा इलेक्ट्रॉनावरील विद्युत् भार एकक मानून व्यक्त केलेला अणुकेंद्रावरील धन विद्युत् भार होय. चिन्ह : Z. उदा., कार्बन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक ६ आहे. त्याच्या अणुकेंद्रात वरील व्याख्येनुसार ६ प्रोटॉन असतात व धन विद्युत् भार इलेक्ट्रॉनाच्या विद्युत् भारापेक्षा ६ पट असतो.

पहा : अणुकेंद्र.

पुरोहित, वा. ल.