उल्हासनगर : ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील उद्योगकेंद्र, लोकसंख्या १,६८,४६२ (१९७१). कल्याणजवळ पूर्वी लष्कराकरिता कँप होता. १९४७ नंतर सिंधमधून आलेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी सरकारने हा कँप दिला. थोड्याच अवधीत येथे नगरपालिका, अद्ययावत इमारती, शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे व विविध उद्योगधंदे निर्माण झाले. कल्याणच्या तीन किमी. ईशान्य-आग्नेयीस पसरलेल्या या शहरात मोठ्या कारखान्यांना पूरक व इतर अनेक छोटे उद्योगधंदे असून जीवनावश्यक वस्तूंची ही मोठी बाजारपेठ समजली जाते.

शाह, र. रू.