उमरेड: नागपूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या २७,०९२ (१९७१). हे आंब नदीच्या तीरावर वसले असून नागपूर चांदा अरुंदमापी रेल्वेमार्गावर, नागपूरपासून ४८ किमी. आहे. गावात एक जुना किल्ला असून गावाशेजारी दोन मोठे तलाव आहेत. लोकसंख्येत कोष्टी समाज संस्थेने जास्त आहे. येथील रेशीमकाठी धोतरे व साड्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. उमरेड हे मोठे बाजारकेंद्र असून येथे मोठ्या प्रमाणावर मिरच्यांचा व्यापार चालतो.

जोशी, चंद्रहास