इव्हँजेलिस्ट : ‘इव्हँजल’ या शब्दाचा अर्थ ‘शुभवार्ता’ म्हणून इव्हँजेलिस्ट म्हणजे शुभवर्तमान सांगणारा. नव्या करारात हा शब्दधर्मोपदेशक याअर्थी वापरला असला, तरी रूढीनुसार तो गॉस्पेल्स लिहिणारे चार ख्रिस्ती संत मॅथ्यू, मार्क, लूक व योहान यांनाच उद्देशून वापरला जातो.
‘परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली, की त्याने त्यासाठी आत्मसमर्पण केले’ हीच ती शुभवार्ता होय. या शुभवार्तेचा सर्वत्र प्रसार व ख्रिस्ती धर्मोपदेशाबाबतची तीव्र कळकळ, हे इव्हँजेलिस्टचे जीवनकार्य होय. बायबल हेच श्रद्धेचे प्रमाण आहे व येशू ख्रिस्ताच्या मुक्तिकार्यावर श्रद्धा ठेवल्यानेच मुक्ती मिळते, या मूलभूत ख्रिस्ती तत्वांवर इव्हँजेलिस्टची नितांत श्रद्धा असते.
आयरन, जे. डब्ल्यू. (इं.) साळवी, प्रमिला (म.)