अष्टदिक्पाल : आठ दिशांचे पालन करणाऱ्या आठ देवांना ही संज्ञा आहे. इंद्र, अग्‍नी, यम, निर्ऋती, वरुण, वायू, कुबेर आणि ईशान हे अनुक्रमे पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैर्ऋत्य, पश्‍चिम, वायव्य, उत्तर आणि ईशान्य ह्या आठ दिशांचे पालन करणारे अष्टदिक्पाल म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची वाहने अनुक्रमे ऐरावत, छाग (मेंढा), महिष, पुरुष, मकर, हरीण, दशाश्वथ (अथवा अश्व अथवा शश) व वृषभ ही होत. आयुधे अनुक्रमे वज्र, शक्ती, पाश व दंड, खड, नागपाश, ध्वज, गदा आणि त्रिशूल ही होत. अनेक धर्मकृत्यांत त्यांना नमन असते. अष्टदिशांना अष्टग्रहही कल्पिले आहेत.

अष्टदिक्पाल

 

 

केळकर, गोविंदशास्त्री