ऑगस्टा: अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी मेन राज्याची राजधानी. लोकसंख्या २१,९४५ (१९७०). ऑगस्टा केनेबेक नदीकाठी, अटलांटिक महासागरापासून ६४ किमी. आत वसले असून तेथपर्यंत मोठ्या बोटी येतात. येथे केनेबेकवर पूल व धरण बांधण्यात आले आहे. कागद, कापड, पादत्राणे, छपाईच्या वस्तू, लाकडी वस्तू यांच्या उत्पादनाकरता तसेच फळे, भाजीपाला, अंडी यांच्या व्यापारासाठी ऑगस्टा प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात हवा खाण्यासाठी येथे प्रवासी येतात.
लिमये, दि. ह.