ऑर्हूस : डेन्मार्कचे दुसऱ्याक्रमांकाचे शहर व जटलंड प्रांताची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह २,३८,१३८ (१९७१). हे सुरक्षित बंदर असून व्यापारी, औद्योगिक, सांस्कृतिक व दळणवळणाचे केंद्र म्हणून प्रसिध्द आहे. येथील यंत्रे, तेलशुध्दि, तंबाखू, डबाबंद मांस आदींचे कारखाने व आस‌वन्या विख्यात आहेत. डेन्मार्कच्या प्राचीन जीवनाचे दर्शन घडविणारे ऑर्हूस संग्रहालय व तेराव्या शतकातील चर्च, ही येथील प्रमुख आकर्षणे होत. १९२८ मध्ये येथे विद्यापीठ स्थापन झाले आहे.

ओक, द. ह.