ऑल सोल्स डे : एक ख्रिस्ती स‌ण. रोमन कॅथलिक चर्चमध्ये २ नोव्हेंबर हा दिवस सार्वजनिक स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्व मृतात्म्यांना स‌द्‌गती प्राप्त व्हावी म्हणून चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना केली जाते. हा स‌ण नेमका केव्हापासून सुरू झाला ते सांगता येत नाही. तथापि दहाव्या शतकापासून तो २ नोव्हेंबर रोजी साजरा होत असल्याचे उल्लेख आढळतात. कल्पित विश्वात्म्यासाठीही या दिवशी प्रार्थना करण्यात येते.

आयरन, जे. डब्ल्यू. (इं.) साळवी, प्रमिला (म.)