आसनसोल : पश्चिम बंगाल राज्याच्या बरद्वान जिल्ह्यातील तालुक्याचे ठाणे. लोकसंख्या १,५७,३८८ (१९७१). हे पूर्व रेल्वेवर कलकत्त्याच्या वायव्येस २११ किमीआहे. आसनसोल हे एक मोठे रेल्वेकेंद्र आहे. बंगालबिहारच्या कोळसा व लोहखनिजाच्या खाणी आणि दुर्गापूर, सिंद्री, चित्तरंजन, जेकेनगर इ. कारखाने यांना हे मध्यवर्ती असून दामोदर खोऱ्यातील सर्वांत महत्त्वाचे ठिकाण आहे.

ओक, शा. नि.