गांधीनगर : गुजरात राज्याचे राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या २४,०५५ (१९७१). १९६० साली राज्यपुनर्रचनेनुसार गुजरात राज्याची स्थापना झाली. आधीच गजबजलेल्या अहमदाबादवर ताण पडू नये म्हणून अहमदाबाद–हिंमतनगर मार्गावर, अहमदाबादच्या उत्तरेस २४ किमी. वर नवीन राजधानी स्थापण्याची योजना ठरली. महात्माजींच्या स्मरणार्थ तिला गांधीनगर नाव दिले गेले. गांधीनगर सभोवतालच्या ७०० चौ. किमी. प्रदेशाचा जिल्हा बनविला गेला. १९७१ साली या जिल्ह्याची लोकसंख्या २,००,५८१ होती. अधिकृत रीत्या राजधानी १९७१ मध्ये गांधीनगरला हलविण्यात आली असली, तरी अद्याप रचना अपूर्ण असल्यामुळे बरीचशी कार्यालये अहमदाबादलाच आहेत.

सचिवालय , गांधीनगर

शाह, र. रू.