पंचवटीतील वटवृक्ष

पंचवटी : महाराष्ट्र राज्याच्या नासिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. नासिक्य (नासिक) म्हणजेच पंचवटी असा वायुपुराणात उल्लेख आढळतो. गोदावरीच्या डाव्या काठावरील नासिक शहराचा भाग, पंचवटी म्हणून परंपरेने ओळखतात. येथील सीता-गुंफे जवळील पाच वटवृक्षांमुळे यास पंचवटी हे नाव पडले असावे. वनवासकाळात रामाने येथे वास्तव्य केले होते आणि या काळात नासिकजवळच असलेल्या सायखेडे गावी रामाने मारीचवध केला तसेच लक्ष्मणाने नासिकजवळच शूर्पणखेला विरूप केले आणि या पंचवटीतूनच रावणाने सीतारहण केले, असे मानले जाते. पंचवटीच्या पूर्वेस सु. दीड किमी.वर तपोवन असून आसपास बरीच तीर्थे आहेत. येथील सीतागुंफा, श्रीराम मंदिर, रामेश्वर मंदिर (नारोशंकर मंदिर) ही प्रेक्षणीय आहेत.

खरे, ग. ह.