हारीती : एक बौद्ध लोकदेवता. यक्षिणी हारीती म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. तिच्याविषयीची माहिती विनयपिटक, महावस्तू, ह्यूएनत्संगाचाप्रवासवृत्तांत, चिनी सूत्रपिटकातील संयुक्तरत्नसूत्र या साहित्यांतून मिळते. शिवाय पुरातत्त्वीय उत्खननांतून तिच्या अनेक मूर्ती उपलब्ध झाल्या आहेत. तिच्याविषयी गंधार देश व उत्तर भारतात अनेक दंतकथा-वदंता प्रचलितआहेत. एका आख्यायिकेनुसार पूर्वजन्मी तिला राक्षसीचा जन्म प्राप्तझाला आणि राजगृहातून (मगध) मुलांना पळवून नेऊन ती त्यांना खातअसे, म्हणून तिला हारीती म्हणजे हरण करणारी हे नाव प्राप्त झालेअसावे. हारीतीला स्वतःला पाचशे मुले होती. एकदा बुद्ध राजगृहातआले असताना लोकांनी तिच्याविषयी त्यांच्याकडे तक्रार केली. तेव्हाबुद्धांनी तिच्या एका मुलाला लपवून ठेवले. मुलगा हरविल्याचे कळल्यावरहारीती दु:खी झाली आणि तिने त्याचा सर्वत्र शोध घेतला. तेव्हाहारीतीला उपदेश करण्यासाठी ही संधी योग्य आहे असे पाहून तिलाबुद्ध म्हणाले, “ज्यांची मुले तू मारून खातेस, त्या मातांची काय अवस्थाहोत असेल, याची कल्पना कर” बुद्धांचे हे शब्द ऐकून ती त्यांना शरणआली आणि तिने यापुढे असे अघोरी कृत्य करणार नाही, अशी प्रतिज्ञाकेली. बुद्धांनी तिला क्षमा केली आणि सद्धर्माचा मार्ग दाखविला. तीबौद्ध भिक्षुणी झाली. बुद्धांनी तिच्या सर्व मुलांना सांभाळण्याची व्यवस्था विहारात केली.

 

यानंतर सर्वत्र हारीतीची पूजा होऊ लागली. बुद्धांच्या आदेशानुसारलोक तिला अन्नधान्य समर्पित करून नृत्यगायनादी कलांची जोपासना करीत. हारीतीच्या मूर्ती-प्रतिमेला भिक्षु-भिक्षुणी वंदन करीत. मगधचे नागरिक गृहदेवीच्या रूपात तिची पूजा करू लागले. उत्तर भारतात आणिवायव्य भारतात, विशेषतः गंधार देशात, हारीतीचा संप्रदाय लोकप्रियहोता, असे ह्यूएनत्संगाच्या प्रवासवृत्तांतात म्हटले आहे. याशिवाय त्याने अशोकाने बांधलेल्या हारीती स्तूपाचा उल्लेख केला आहे. एम्. फौचरया पुरातत्त्ववेत्त्याने पेशावर जिल्ह्यातील सारे-माखे-ढेरी हाच तो स्तूपअसावा, असे म्हटले आहे. याशिवाय हारीतीची पूजा चीन, जपान,कोरिया या देशांतूनही प्रचलित झाली. चीनमध्ये ती क्वान-चिन यानावाने पूजिली जाई तर कोरियात ती किशी-मो-जिन या नावानेओळखली जाई.

 

हारीतीची अनेक प्राचीन व मध्ययुगीन शिल्पे आढळली असूनत्यांपैकी काही कलात्मक व लक्षणीय आहेत. हारीतीच्या गंधार मूर्तींमध्ये कधीकधी तिचा पती कुबेर बरोबर असतो. तिथे कुबेराचा उल्लेखपांचिक असा करतात. पाकिस्तानातील पेशावर वस्तुसंग्रहालयात हारीतीच्या दोन मूर्ती आहेत. त्यांपैकी पहिली मूर्ती तख्त-इ-बाही येथील कडेवरमूल घेतलेली आहे तर दुसरी मूर्ती सह्‍री -बहलोल येथील दम्पतीशिल्प आहे. मात्र हारीती कुबेरासोबत कोचावर बसलेली असून तिच्या मांडीवर मूल आहे. तसेच दोघांच्या पायापाशी, पाठीमागे मुले आहेत.एकूण हारीतीच्या मूर्तिसंभारातील हे दम्पती शिल्प विलक्षण सुंदर असून दोघांच्या चेहऱ्यांवरील स्मितहास्य व वस्त्रांच्या चुण्या लक्ष वेधतात. नालंदा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरही हारीतीची प्रतिमा होती. तिच्या मूर्तिशिल्पात प्रामुख्याने तिच्याभोवती बरीच मुले दर्शविलेली असतात. त्यांतले एखादे मूल तिच्या कडेवर बसलेले – पुत्रवल्लभा-शिल्प – आढळते तर काही मूर्तीत मुले तिच्या खांद्यांवर बसलेली आढळतात. एकूण तिच्या मूर्तिशिल्पात तिची वस्त्रे वाऱ्यावर उडत असताना दाखविलेली असतात. डाक्का वस्तु-संग्रहालयातील हारीतीच्या मूर्तीच्या पादपीठावर एक स्त्री मासा तोडतानाचे दृश्य खोदले आहे. विष्णुधर्मोत्तर पुराणात अष्टदिक्पालांच्या वर्णनातगंधार येथील कुबेर आणि हारीती शिल्पांचा उल्लेख आढळतो. यावरून प्राचीन काळी हारीतीला पांचिकपत्नी म्हणजे कुबेराची पत्नी ही ओळखप्राप्त झाली होती. बादामीच्या सुरुवातीच्या चालुक्य राजांच्या कोरीवलेखांत ते हारीतीचे वंशज असल्याचा उल्लेख असून त्यांचे संगोपन-संवर्धन सप्तमातृकांनी केल्याचा उल्लेख आहे. तो असा : ‘हारीती-पुत्रनाम्‌सप्तमातृभिरभिवर्धितानाम्’.

 

संदर्भ : 1. Banerjea, Jidendra Nath, The Development of Hindu Iconography, Calcutta, 1956.

           २. अग्रवाल, वासुदेवचरण, प्राचीन भारतीय लोकधर्म, १९६४.

देशपांडे, सु. र.