सोलॅनमसोलॅनम वेंडलँडी : (इं. जाएंट पोटॅटो व्हाइन, कोस्टा रीका नाईटशेड, पॅराडाईज फ्लॉवर कुल-सोलॅनेसी). ही जोमदार वाढणारी वेल मूळची कोस्टा रीका येथील आहे. ही वेल ३-४·५ मी. उंच व ४-८ सेंमी. रुंद वाढते. खोड, फांद्या व देठावर तुरळक काटे (कधी कधी ते नसतात), फक्त खालच्या भागातील पाने खंडित व मोठी असतात. फुले पावसाळ्यात वल्लरीवर येतात. ती निळसर गुलाबी व चक्राकृती असतात. मृदुफळ अंडाकृती, ३५-४० मिमी. व्यासाचे पिवळसर किंवा १०-१५ मिमी. व्यासाचे गडद हिरवे असून पक्व झाल्यावर लाल होते, असे नोंदविले गेले आहे. ⇨ सोलॅनेसी कुलातील वर्णनानुसार फळ ३–५ सेंमी. व्यासाचे गोलाकार हिरवे व हिरवट ते पांढरा मगज असलेले, सुकल्यावर खरबरीत कांतीचे होते. सामान्य शारीरिक लक्षणे सोलॅनेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

वेलीच्या वाढीसाठी पाणी व सूर्यप्रकाशाची समप्रमाणात गरज असते. सावलीत छाट कलमे चांगली वाढतात.

हॅनोव्हर (जर्मनी) येथील शास्त्रीय उद्यानाचे प्रमुख डॉ. वेंडलँड यांच्या नावावरून या वेलीला नाव देण्यात आले आहे (१८८२).

जोशी, रा. ना.

Close Menu
Skip to content