सोलॅनम वेंडलँडी : (इं. जाएंट पोटॅटो व्हाइन, कोस्टा रीका नाईटशेड, पॅराडाईज फ्लॉवर; कुल – सोलॅनेसी). ही जोमदार वाढणारी वेल मूळची कोस्टा रीका येथील आहे. ही वेल ३–४·५ मी. उंच व ४–८ सेंमी. रुंद वाढते. खोड, फांद्या व देठावर तुरळक काटे (कधी कधी ते नसतात), फक्त खालच्या भागातील पाने खंडित व मोठी असतात. फुले पावसाळ्यात वल्लरीवर येतात. ती निळसर गुलाबी व चक्राकृती असतात. मृदुफळ अंडाकृती, ३५–४० मिमी. व्यासाचे पिवळसर किंवा १०–१५ मिमी. व्यासाचे गडद हिरवे असून पक्व झाल्यावर लाल होते, असे नोंदविले गेले आहे. ⇨ सोलॅनेसी कुलातील वर्णनानुसार फळ ३–५ सेंमी. व्यासाचे गोलाकार हिरवे व हिरवट ते पांढरा मगज असलेले, सुकल्यावर खरबरीत कांतीचे होते. सामान्य शारीरिक लक्षणे सोलॅनेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.
वेलीच्या वाढीसाठी पाणी व सूर्यप्रकाशाची समप्रमाणात गरज असते. सावलीत छाट कलमे चांगली वाढतात.
हॅनोव्हर (जर्मनी) येथील शास्त्रीय उद्यानाचे प्रमुख डॉ. वेंडलँड यांच्या नावावरून या वेलीला नाव देण्यात आले आहे (१८८२).
जोशी, रा. ना.