सोडा नायटर : हे सोडियमाचे खनिज असून त्याचे समांतर षट्फलकीय स्फटिक विरळाच आढळतात सिस्फटिकविज्ञार्नें. कठिनता १·५-२ वि. गु. २-२·९ चमक काचेसारखी पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी चव शीतकारी सिखनिजविज्ञार्नें. रा. सं. छरछज३. रंग पांढरा, तांबूस, उदसर, करडा वा पिवळसर. ते पाण्यात पूर्णपणे व सहजपणे विरघळते. त्यामुळे हे चिघळणारे (आर्द्रविद्राव्य) खनिज शुष्क वाळवंटी भागांतच आढळते. ते मुख्यत्वे पुटांच्या रूपात व थरांमध्ये संपुंजित रूपात आढळते. ते कॅल्साइट या खनिजाशी समरूप असल्याने त्याचे स्फटिकविषयक स्थिरांक, ⇨ पाटन व प्रकाशकीय गुणधर्म कॅल्साइटासारखे असतात [⟶ कॅल्साइर्टें].

उत्तर चिली व त्यालगतचा बोलिव्हियाचा भाग येथे सोडा नायटरचे मोठे साठे आहेत. चिलीमध्ये ते खणून काढल्यावर त्याचे परिष्करण (शुद्धीकरण) करतात. नायट्रोजनाचा स्रोत म्हणून त्याचा उपयोग होतो. नायट्रिक अम्ल, नायट्रेट , स्फोटक द्रव्ये व खते यांच्या निर्मितीत मुख्यत: त्याचा उपयोग होतो. बंदुकीच्या दारूतही त्याचा उपयोग करता येतो. मात्र ही दारू नेहमीच्या नायटर (पोटॅशियम नायट्रेट) युक्त बंदुकीच्या दारूपेक्षा अधिक आर्द्रताशोषक व मंदपणे जळणारी असते [⟶ बंदुकीची दारू].

सोडा नायटरला चिली सॉल्ट पीटर वा पेरू सॉल्ट पीटर व नायट्राटाइन ही नावेही आहेत. त्याच्या निक्षेपालाही चिली सॉल्ट पीटर म्हणतात. सोडियम नायट्रेट या रासायनिक संघटनावरून त्याचे सोडा नायटर हे नाव आले आहे.

पहा : नायटर.

ठाकूर, अ. ना.