कॅल्सेडोनी : खनिज. गूढस्फटिकी(अगदी सूक्ष्म स्फटिकमय), तंतुमय क्वॉर्टझाचे (सिलिकेचे)नाव. स्तनाकार, गुच्छाकार किंवा झुंबराकार स्वरुपात आढळते. हे पारदर्शक किंवा दुधी काचेसारखे पारभासी असून याची चमक मेणासारखी किंवा जवळजवळ तशी असते. रंग पांढरा, करडा, उदी किंवा काळा. कठिनता ७.वि.गु.२.६०-२.६४. यांच्यात सामान्यतः ओपल प्रकारची सिलिका कमीअधिक प्रमाणात विकीर्ण झालेली (विखुरलेली)असते. जलीय विद्रावातील क्वॉर्टझ खडकांतील पोकळयांच्या भिंतीवर किंवा पोकळयात निक्षेपित होऊन(साचून) कॅल्सेडोनी तयार झालेले असते. लाल कॅल्सेडोनीला कार्नेलियन, उदी कॅल्सेडोनीला सार्ड, पोपटी कॅल्सेडोनीला क्रिसोप्रेज व पट्‌टेदार कॅल्सेडोनीला  अकीक म्हणतात.

पहा : क्वॉर्ट्‌झ.

ठाकूर, अ .ना.