केसॉन सिटी : फिलिपीन्सची अधिकृत राजधानी. लोकसंख्या ९,७१,६३७ (१९७०). राष्ट्राध्यक्ष मानवेल लूईस केसॉन इ मोलीना (१८७८ – १९४४) याच्या स्मरणार्थ मानिलाच्या थोडे पूर्वेस, ३० मी. उंचीवरील मैदानावर हे शहर १९४८ साली उभारण्यात आले. फिलिपीन्स द्विपसमूहापैकी लूझॉन बेटाच्या दक्षिण भागावर ही दोन्ही शहरे असून मानिलापेक्षा केसॉन सिटीमध्ये दमटपणा कमी व तपमान सुसह्य असते. केसॉन सिटीमध्ये सध्या फिलिपीन्स विद्यापीठ, काही सरकारी कचेऱ्या व थोड्या प्रमाणात लहान उद्योगधंदे असून कारभार मानिलाहूनच चालतो.

शाह,र. रू.