खानदेश : महाराष्ट्राच्या जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांच्या एकूण प्रदेशाचे पूर्वीचे नाव. १९६० पर्यंत हे जिल्हे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश म्हणून प्रसिद्ध होते. प्राचीन काळी याला ऋषिक देश म्हणत. तर यादवकालीन शिलालेखांत याचा सेऊण देश असा उल्लेख आहे. मोगल कारकीर्दीत याला खानदेश असे नाव पडले. यादव वास्तुशिल्प शैली, अहिराणी बोली, कापूस व ज्वारी ही पिके, भिल्लांची डोंगराळ भागातील वस्ती, तापी नदी व तिच्या उपनद्या आणि जंगली उत्पन्न ही खानदेशाची वैशिष्ट्ये होत [→ जळगाव जिल्हा धुळे जिल्हा].

कापडी, सुलभा