कुरिची: तमिळनाडू राज्याच्या कोईमतूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर. लोकसंख्या ४०,५३७ (१९७१). हे नोयिल नदीकाठी कोईमतूरच्या दक्षिणेस ५ किमी. आहे. कुरिची नगरसमूह कुरिचीखेरीज सिंगनल्लूर, उप्पिलिपालयम्‌, कनियमुथुर, वेल्ललोर व मदुक्कराई ही भोवतालची गावे मिळून २ लाखांहून अधिक लोकवस्तीचा आहे. कुरिचीला सूतगिरण्या आहेत व इतर गावेही कोईमतूरच्या परिसरातील कारखान्यांमुळे वाढली आहेत. तेथे सूतगिरण्या, साखरकारखाने, सिमेंट व साबणाचे कारखाने आणि पानमळे आहेत.

ओक, शा. नि.