कुमारघोष : (सु. नववे शतक). आग्नेय आशियाचा प्रवास करणारा भारतीय बौद्ध भिक्षू. हा मूळचा बंगालमध्ये राहणारा असावा. तेथील राजा देवपाल याने नवव्या शतकात जावामध्ये राज्य करीत असलेल्या शैलेंद्र राजाकडे कुमारघोषला धार्मिक सल्लागार म्हणून पाठविले. तिकडील मंदिरांत सापडलेल्या अनेक लेखांमध्ये कुमारघोषाचा उल्लेख आढळतो, त्यावरून याचा प्रभाव दिसतो.
शाह, र. रू.