कुंथलगिरी : उस्मानाबाद जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील स्थळ आणि दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र. हे बार्शीच्या ३५ किमी. व भूमच्या ९ किमी. उत्तरेस, ७५० मी. उंचीच्या एका टेकडीवर आहे. कुंथुगिरी, वंशगिरी, रामगिरी अशा नावांनीही याचा उल्लेख आढळतो. कुलभूषण व देशभूषण या मुनींचे हे तपस्यास्थान व मुक्तिस्थान असून दक्षिण भारतातील एकमेव सिद्धक्षेत्र असल्याने पवित्र मानले जाते. येथे दहा मंदिरे असून मार्गशीर्ष पौर्णिमेला यात्रा भरते.

शाह, र. रू.