गोवळकोंडा : आंध्र प्रदेश राज्यातील प्रसिद्ध किल्ला व शहर. हे हैदराबादच्या पश्चिमेस सु. ८ किमी. असून

गोवळकोंडा किल्ल्याचे अवशेष

सध्या उद्ध्वस्त आहे. पूर्वी हे कुत्बशाही प्रदेशात सापडणाऱ्या हिऱ्यांसाठी प्रसिद्ध होते. मात्र याच्या आसपास हिरे सापडत नाहीत. वरंगळच्या राजाने येथील किल्ला बांधला. चौदाव्या शतकात हा बहमनी सत्तेकडे दिला गेला व मुहंमदनगर म्हणून ओळखला जाऊ लागला.सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस हा कुत्बशाहीच्या अंमलाखाली आला हैदराबाद राजधानी वसविण्यापूर्वी गोवळकोंडा हीच त्यांची राजधानी होती. पुढे १६८७ मध्ये औरंगजेबाने हे जिंकून घेतले.

ग्रॅनाइटी खडकावर बांधलेल्या या किल्ल्याला ८७ बुरुज व सु. ४ किमी. घेराचा तट असून आत आजही अनेक पडके वाडे, मशिदी असून त्यांचे अवशेष इतस्ततः विखुरलेले आहेत. बाला हिसार नावाचा बालेकिल्ला मात्र अजून चांगल्या अवस्थेत आहे. किल्ल्याला आठ दरवाजे असून त्यांपैकी चार सध्या वापरात आहेत. किल्ल्याभोवतीचे खंदक बुजलेले असून त्याच्या दक्षिणेकडून मूसी नदी वाहते. जवळच कुत्बशाही सुलतानांचे कबरस्तान आहे.

कापडी, सुलभा