चुशूल: जम्मू — काश्मीर राज्याच्या लडाख जिल्ह्यातील महत्त्वाचे ठाणे. हे लडाख पर्वतश्रेणीत, श्योक हिमनदीच्या मुखाजवळ, ४,३३७ मी. उंचीवर, लेहच्या आग्नेयीस ११२ किमी., गार्टोक — मोजी व्यापारमार्गावर आहे. चीनने १९६२ मध्ये अक्साई चीन व्यापल्यामुळे भारत — चीन सीमा चुशूलजवळ आली आहे. त्यामुळे याला सैनिकी महत्त्व आले आहे.
कांबळे, य. रा.
“