चुंबी खोरे : सिक्कीम व भूतान यांदरम्यानचे तोरसा नदीचे वरचे खोरे. भारतातून तिबेटमध्ये ग्यांगत्से — ल्हासाकडे जाण्याचा सर्वांत जवळचा रस्ता येथून आहे. याच्या माथ्यावर ४,६३३ मी. उंचीची टांग ला खिंड आहे. तिच्या दोन्ही बाजूंचा उतार सौम्य आहे. भारत व तिबेट यांमधील इतर वाटांनी होणाऱ्या एकूण व्यापाराइतका व्यापार एकट्या या मार्गाने होतो. नेपाळी व्यापारीही भारताशी या मार्गाने काही व्यापार करतात.

कुमठेकर, ज. ब.