कुंभोज : कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील स्थळ. लोकसंख्या ७,३३६ (१९६१). हे मिरज – कोल्हापूर लोहमार्गावरील हातकणंगले स्थानकाच्या उत्तरेस ६ किमी. असून कुंभोजपासून दीड किमी.वरील कुंभोजगिरी येथे जैनांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. सु. १०० मी. उंचीवरील डोंगरावर पाच जैन मंदिरे असून, डोंगरपायथ्याशी बाहुबलीची सु. ६ मी. उंचीची मूर्ती आहे. कार्तिक व चैत्र पौर्णिमांना येथे मोठ्या यात्रा भरतात. येथे तंत्रशाळा असल्याने जिल्ह्यातील शिक्षणाचेही हे केंद्र बनले आहे.

शाह, र. रू.