गंगा: भारतातील सर्वांत मोठी व सर्वांत पवित्र नदी. लांबी २,५१०किमी., जलवाहन क्षेत्र ८,३८,२०० चौ . किमी., म्हणजे भारताच्या क्षेत्रफळाचा सु. चौथा हिस्सा. गंगेच्या खोऱ्यातीलउ. प्रदेश, बिहार व प. बंगाल याराज्यांत भारतातील सु. 3५% लोक राहतात. या तीन राज्यां त मिळून लोकसंख्येची सरासरी घनता दर चौ . किमी.३४६·३३ आहे. गंगेचा उगम उ. प्रदेशाच्या प. कुमाऊँभागात टेहरी-गढवाल जिल्ह्यातील ४,०६२ मी. उंचीच्या गंगोत्री या क्षेत्रापासून सु. २९ किमी., ४,२०६ मी. उंचीवरील गोमुख येथे, गंगोत्री हिमनदीच्या टोकाशी हिमगुहेतून होतो. गंगेला उन्हाळ्यातही पाणी पुरवणारी ही गंगोत्री हिमनदी ३०किमी. लांब व ३ किमी. रूंदआहे. बद्रीनाथ व गंगोत्री मंदिरापर्यंत उतरलेल्या हिमनद्या आता मागे हटल्या आहेत. भागीरथी या नावाने उगमापासून ३५ किमी. पश्चिमेकडे आणि मग हिमालयाच्या रांगांतून, खोल दऱ्यांतून १४०किमी. दक्षिणेकडे गेल्यावर तिला देवप्रयाग येथे अलकनंदा हा गंगेचा दुसराशीर्षप्रवाह मिळतो. बद्रीनाथ गावाच्या मागे सतोपंथवभगीरथ खो रक हिमनद्यांच्या जिव्हेतून नंदादेवीच्या उत्तरेस, तिबेटच्या सरहद्दीजवळ, अलकनंदेच्या शीर्षप्रवाहाचा उगम होतो. जोशीमठ येथे बद्रीनाथकडून आलेली विष्णु गंगा आणि द्रोणगिरीकडून आलेली धौलीगंगा एकत्र येतात व विष्णुप्रयागनंतर तिला अलकनंदा म्हणतात. तिला कर्णप्रयाग येथे पिंडरगंगा व रूद्रप्रयाग येथे मंदाकिनी मिळते. देवप्रयागनंतर भागीरथी -अलकनंदा संयुक्त प्रवाहाला गंगा हे नाव प्राप्तहोते. मग दक्षिणेकडे ७०किमी. जाऊन नाग टिब्बा व शिवालिक रांगातून खडक फोडून, वाट काढून ह्रषीकेशवरून हरद्वा र येथे गंगा मैदा नी प्रदेशात येते.

‘हरकी पौरी’, हरद्वार.

हरद्वारहून गढमुक्तेश्वरावरून अनूपशहरापर्यंत गंगा दक्षिणेस, तेथूनफरूखाबाद, कनौज, कानपूरवरून अलाहाबाद (प्रयाग) पर्यंत आग्नेयीकडे, मग दक्षिणेकडून मोठे चंद्राकृती वळण घेऊन वाराणसीपर्यंत आणि तेथून गाझीपूर, बलिया, पाटणा, मोंघीर, भागलपूर, साहेबगंजवरून प. बंगालच्या सरहद्दी पर्यंत सामान्यत: पूर्वेकडे सु. १२०किमी. वाहत जाते. बिहारमधील राजमहाल टेकड्यांना वळसा घालून गंगा प. बंगालमध्ये शिरते. प. बंगालमध्ये आग्नेय दिशेने प्रथम त्याच्या प. सीमेवरून, मग त्याचा चिंचोळा भाग ओलांडून पूर्वसीमेवरून व मग त्याच सीमेवरून, दक्षिणेकडे सु. ४०किमी. गेल्यावर पुन्हाआग्नेय दिशेने बांगला देशात जाते. ग्वालंदोजवळ तिला बह्मपुत्रामिळते व मग ती पद्माया नावाने वाहते. पुढे फरीदपूरच्या पूर्वेस मेघनेच्या खाडीला मिळून दक्षिण याबेटाजवळ बंगालच्या उपसागरास मिळते. प. बंगाल व बां गला देश यांत गंगेचे असंख्य शाखाप्रवाह होऊन जगातील सर्वांतविस्तीर्ण ५८,७५२ चौ. किमी. क्षेत्रफळाचा त्रिभुजप्रदेश तयार झाला आहे. त्याच्या द. तीरावर अनेक बेटे तयार झाली असून तेथे समुद्राला मिळणाऱ्या प्रवाहांच्या मुखास गंगेची मुखे म्हणतात. गंगेच्या मुखांजवळचा, सु. १६,९०० चौ. किमी. विस्ताराचा, अरण्यमय आणि दलदलीचा, सुंदरबन हा प्रदेश सुप्रसिद्ध शाही बंगाली वाद्यांचे वसतिस्थान होय.

गंगेला फरूखाबादच्यावर नुता तसेच फरूखाबाद व हरदोई यांच्या दरम्यान रामगंगा मिळते. हिमालयात जग्नोत्री येथे उगम पावलेलीयमुना नदी दिल्ली, मथुरा, आग्रा, इटावावरून गंगेला सु. ८००किमी.समांतर वाहून, गंगा मैदानाच्या प. सीमेवरून येऊन, माळवा पठारावरील चंबळ, सिंध, बेटवा, केन यांचे तसेचहिमालयातील तोन्स नदीचे व गंगा सिंधू अंतर्वेदीतील काही प्रवाहां चे पाणी गोळा करून अलाहाबाद येथे गंगेला उजवीकडून मिळते. तेथे तिचे स्वच्छ, काळसर पाणी आणि गंगेचे गाळमिश्रितपांढुरके पाणी यांतील फरक सहज लक्षात येतो.

अलाहाबाद ववाराणसी यांच्या दरम्यान द. तोन्स, छप्रा आणिपाटणा यांच्या दरम्यान शो ण पाटणा येथे पुनपुन, लखिसराईच्या ईशान्येस गयेवरून आलेली फल्गू, या नद्या व इतर अनेक प्रवाह गंगेला उजवीकडून मिळतात. त्यांना फक्त पावसाच्याच पाण्यांचा पुरवठा होतो हिमालयात उगम पावलेल्या नद्यांप्रमाणे उन्हाळ्यात वितळणाऱ्या बर्फाचे पाणी मिळत नाही. गंगेला डावीकडून वाराणसी व गाझीपूर यांच्या दरम्यान गोमती बलियाच्यां  पश्चिमेस तमसा किंवा पू. तोन्स छप्रा येथे घागरा म्हणजेच शरयूकिंवा पूर्वीची घर्घरासोनपूर येथे गंडकी, मोंघीर जिल्ह्यात बुरी गंडक मनिहारीघाटाच्या थोडे वर एव्हरेस्ट भागातून आलेली कोसी आणि तिच्यापूर्वेस महानंदा या प्रमुख नद्या व इतर अनेक प्रवाह मिळतात.

प. बंगालमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यात जंगीपूरच्या थोडे उत्तरेस धुलिआनजवळ गंगेचे भागीरथी-हुगळी व पद्मा-मेघना असे दोन फाटे होतात. या भागीरथीला प. बंगालमध्ये बन्सलोई, काटवा, अजया, दामोदर, रूपनारायण, पानार इ. लहानमोठ्या नद्या मिळतात. भागीरथीच्या समुद्राकडील भागास हुगळी म्हणतात. तिच्या काठी कलकत्ता व त्याच्याजवळचा औद्योगिक विभाग वसलेला आहे. शहाजहानने पोर्तुगीजांना बंगालमध्ये व्यापाराची परवानगी दिल्यावर होगला नावाचे गवत वाढत असे. त्यावरून जवळच्या नदीला ओगोलिम नाव मिळाले. त्याचे पुढे ओगली व ब्रिटिशांच्या काळात हुगळी झाले. हुगळीच्या मुखाजवळ सागर हे बेट आहे.

उगमापासून हरद्वारपर्यंतचा गंगेचा प्रवाह हिमालयाच्या डोंगराळ भागातून, नंदादेवी, कामेट इ. उत्तुंग शिखरसमूहांच्या प्रदेशातून, अनेक प्रवाहोपप्रवाहांचे पाणी समाविष्ट करीत करीत वेगाने खाली येतो. या भागात हिंदूंची अनेक तीर्थक्षेत्र, काही उष्णोदकांचे झरे, अरण्ये, वन्य पशुपक्षी, गिरिजन इ. आहेत.

हरद्वारपासून मुखापर्यंत गंगेचा ३,५७,००० चौ. किमी. क्षेत्र व्यापणारा विस्तीर्ण सपाट मदानी प्रदेश आहे. त्यात उ. प्रदेश, बिहार आणि प. बंगाल ही भारताची राज्ये येतात. हा मैदानी प्रदेश गंगेने व तिच्या उपनद्यांनी आणलेल्या गाळाने बनलेला आहे. उ. प्रदेशातील गंगा-यमुना अंतर्वेदी किंवा दोआब हा अशा प्रकारचा सर्वांत मोठा प्रदेश आहे. त्यात अनेक प्रवाह आहेत. त्यांपैकी हिंदन हा सर्वांत मोठा आहे. सहारनपूर ते मीरतवरून अलीगढपर्यंत प्रदेशाची उंची २७४ मी. पासून २२४ मी. व १८६ मी. पर्यंतच उतरली आहे. गंगेचा ‘बांगर’ म्हणजे जुन्या गाळाचा व ‘खादर’ म्हणजे नव्या गाळाचा प्रदेश या अंतर्वेदीत स्पष्ट आहे. बांगरभाग सोपानित म्हणजे पाय पायऱ्या पायऱ्यांचा आहे. पायरी नदीजवळ असेल (उदा., बुलंदशहर जिल्हा), तर ती काठच्या प्रदेशाचे पुरापासून रक्षण करते. मीरत व मुझफरनगर जिल्ह्यांत ती दूर असल्यामुळे काठचा प्रदेश पुराखाली जातो. ही अंतर्वेदी पूर्व यमुना कालवा व गंगेचा वरचा कालवा यांनी भरपूर सिंचित आहे. पर्जन्यमानही ६० सेंमी. ते १०० सेंमी. आहे. प्रदेशाच्या सपाटपणामुळे गंगेचा प्रवाह अनेक मार्गांनी व वाळूचे बांधसाचवीत वेणीप्रवाह रूपाने वाहतो. भूमिगत पाणी भरपूर असल्यामुळे या भागात विजेच्या पंपाने पाणी काढता येणारे नलिकाकूप हजारोंनी आहेत. गंगा व हिमालय यांच्या दरम्यान रोहिलखंड व अवध यांचा मैदानी प्रदेश आहे. त्यातून रामगंगा, गोमती आणि शारदा या आग्नेयीकडे वाहतात. ही गंगा-घागरा अंतर्वेदीही अशीच समृद्ध आहे.

बिहारमध्ये गंगेच्या मैदानाचा ८८,००० चौ. किमी.क्षेत्राचा प्रदेश आहे.घागरा, गंडक व कोसीयाव इतर असंख्य प्रवाहांनी उत्तर बिहारमध्ये ५४,४oo चौ. किमी.चा २,००० मी. खोलीचा जगातील एक अत्यंत विस्तीर्ण गाळप्रदेश बनविलेला आहे. प्रदेशाचा उतार दर किमी. फक्त २o सेंमी. आहे. छप्रानंतर गंगेच्या दोन्ही काठांपलीकडेमोठमोठे खोलगट भाग आहेत. उ. बिहारमध्ये त्यांना ‘कोर’ म्हणतात. ते दलदलींनी युक्त असून पावसाचे पाणी त्यांत साठते. द. बिहारमध्ये पाटण्याजवळ अशा द्रोणी भागास ‘जल’ व मोकामेहजवळ ‘तल’ म्हणतात. त्यांचे गंगेच्या बाजूचे काठ उंच असतात. या पूर्वीच्या पूरतटांच्या खुणा होत. राजमहाल टेकड्यांच्या पश्चिमेस प्रदेशाचा उतार उत्तरेस किंवा ईशान्येस असून तो दर किमी. फक्त ९ सेमी. आहे.

उ. बंगालमधील मैदानी प्रदेश २३,०००चौ. किमी. असून त्यातील पूर्वेकडील नद्या बम्ह्मपुत्रेस मिळतात. प. भागात तिस्ता, जलढाका व तोरसा या नद्यांनी आणलेल्या डबराचा प्रदेश उत्तम जलवाहनाचा असून कसलेल्या मृदेच्या व इतर सोयींच्या भागात चहाचीलागवड चांगली होते.द्वा रप्रदेशाच्या दक्षिणेकडील सपाट प्रदेश जलविद्ध (वॉटरलॉग्ड) होते . पूर्वी गंगेचे पाणी मुख्यत: तिच्या भागीरथी-हुगळी शाखेतून वाहत असे व पुराच्या वेळी जास्त पाणी पद्मा-मेघनाकडे जाई. अठराव्या शतकाच्या अखेरीस पद्माफाट्या कडे जास्त  पाणी जाऊ लागले वभागीरथी-हुगळीच्या शेवटच्या ३००किमी. भागातपाणी कमी पडूलागले. पात्रातील गाळ काढण्याचा उपयोग काही दिवस झाला, परंतु पुढेत्यानेही भागेना. तसेच हुगळीच्या मुखातूनभरतीची लाट वर्षभर जोरात आत घुसते. यामुळे कलकत्ता वत्याजवळील औद्योगिक विभाग यांस पाणीटंचाईचा धोका उत्पन्न झाला. त्यावर एक उपायफराक्का बंधारा हा काढला आहे. कलकत्याच्या समृद्ध पृष्ठप्रदेशामुळे हुगळी नदी सतत नौकासुलभठेवणे आवश्यक आहे. जलमार्गम्हणूनही गंगेचे महत्व मोठे आहे. कलकत्ता समुद्रापासून १४०किमी. आत आहे. तेथपर्यंत मोठ्या सागरगामी नौका जातात. पाटण्यापर्यंत लहान आगबोटी जातात. कानपूर व हरद्वारपर्यंतही साध्यानौकां तून सतत रहदारी चालू असते. प्रवाहबदल आणि वाळूचे बांध यांमुळे आगबोटी अगदी वरपर्यंत जाऊ शकत नाहीत. गंगायमुनांच्या कालव्यां तूनही सतत वाहतूक चालते.

भागीरथीचा अवखळ प्रवाह : गंगोत्री

गंगेइतके धार्मिक महत्त्व जागातील दुसऱ्या कोणत्याही नदीला नसेल. जन्मात एकदा तरी गंगास्नान घडावे, अशी कोट्यावधी हिंदूं ची इच्छा असते. (हिंदूना पवित्र वाटणाऱ्यासात नद्यांत गंगेचे स्थान पहिले आहे. ‘जय गंगे भागीरथी’ असा घोष करून कोणत्याही नदीत स्नान केले, तरी गंगास्नान घडले असे भाविक हिंदू मानतात. गंगेला विष्णुपदी, त्रिपथगा, भागीरथी, जान्हवी इ. अनेक नावे आहेत. ‘स्त्रोतसामस्मिजान्हवी’ असे श्रीकृष्ण गीतेत सांगतो. गंगातीरी आपला मृत्यू व दहन व्हावे, निदान आपल्या अस्थी गंगेत पडाव्या असे श्रद्वाळू हिंदू मनास वाटते. हरद्वार, अलाहाबाद वगैरे तीर्थांहून गंगेचे पाणी गडव्यात बंद करून आणतात, त्याची पूजा करतात, मरणासन्नाच्या मुखी गंगोदक घालतात. गंगाजल हातात घेऊन शपथ घेणे, नवीन खोदलेल्या विहिरीत गंगाजल टाकणे, मंगलप्रसंगी गंगाजलाचा अभिषेक करणे इ. चालीही आहेत. गंगेचे पाणी पथ्यकर व रोगहारक असल्याची ख्याती आहे, महंमद तुघलक, अकबर, औरंगजेब व इतर अनेक राजघराण्यांतील लोक नियमित गंगाजल सेवन करीत असत. पं. मालवीयांनी विलायतेस जाताना पुरेसे गंगाजल बरोबर नेले होते. गुप्तकालात गंगेचे स्त्रीरूप कल्पिले गेले. बंगालमध्ये गंगामूर्ती मकरारूढ असते, तर द. भारतात तिच्या देहाचा खालचा भाग मत्स्यस्वरूपी असतो. ऋग्वेदात मात्र गंगेचा उल्लेख फक्त दोनदाच आला आहे. त्यावेळी आर्य लोक गंगाप्रदेशात नुकते येत होते. त्यानंतरच्या ब्राह्मणे, आरण्यके, पुराणे इत्यादिकांत गंगेची भरपूर महती गायलेली आहे. गंगेचे स्तवन करण्यात मोठमोठ्या विद्वानांनी धन्यता मानली आहे.

पं. जवाहरलाल नेहरू आपल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथात म्हणतात, ‘भारताचे हृदयच जिने बंदिवान करून ठेवले आहे आणि इतिहासाच्या उष:कालापासून कोटिकोटी भारतीयांना जिने आपल्याकडे ओढून घेतले आहे, ती भारताची एकमेव सर्वश्रेष्ठ नदी गंगा… उगमापासून सागरापर्यंतची आणि प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतची गंगेची कथा म्हणजे भारताची सभ्यता व संस्कृती, साम्राज्यांचा उदय आणि अस्त…भारतीय विचारवंतांना व्यग्र करून टाकणारा मनाचा शोध, जीविताची परिपूर्ती…त्यातील अस्वीकार आणि त्याग…जीवन आणि मृत्यू यांची कथा आहे’.

संदर्भ : Misra, S. D. Rivers of lndia, New Delhi, 1970.

कुमठेकर, ज. ब.