निषध : विंध्य पर्वत व अवंती यांच्या उत्तरेकडील मध्य भारतातील एक प्राचीन देश. नल राजाच्या आधिपत्याखालील या देशाचा उल्लेख शतपथ ब्राह्मण, महाभारत आणि पुराणे यांत आढळतो. याची गिरिप्रस्थ ही पहिली आणि अलकापुरी ही दुसरी राजधानी. ‌‌‌मध्य प्रदेश राज्याच्या शिवपुरी जिल्ह्यातील सध्याचे नरवर म्हणजेच नलाने वसविलेले ‘नलपूर’ असे म्हणतात.

सातपुडा, विंध्य पर्वत तसेच नर्मदा व तापी नद्यांची खोरी व त्यांचा जंगलयुक्त भाग निषाद वा निषाधभूमी म्हणून ओळखत असत. राजस्थानातील मारवाड प्रांतातून इतर रानटी जमातींनी हाकलल्यामुळे निषादांनी (भिल्ल व इतर जमाती) या भागात वसती केली व यामुळेच या प्रदेशास निषादभूमी हे नाव पडले.

खरे, ग. ह.