दिगंशाचे विवरण

दिगंश : एखाद्या खस्थ पदार्थाचे वा बिंदूचे दिगंश म्हणजे त्या बिंदूतून जाणारे ऊर्ध्वमंडल (खस्थ पदार्थ वा बिंदू आणि निरीक्षकाचे खस्वस्तिक–निरीक्षकाच्या डोक्यावरील खगोलावरील बिंदू–यांतून जाणारे वर्तुळ) क्षितिजाला ज्या बिंदूत छेदते तो बिंदू व निरीक्षकाचा क्षितिजावरील उत्तर किंवा दक्षिण बिंदू यांमधील सव्य (घड्याळ्याच्या काट्यांच्या हालचालीच्या दिशेत मोजलेले) कोनीय अंतर होय. हे अंतर ०° पासून ३६०° पर्यंत असते. आकृतीमध्ये दखउ हे निरिक्षकाचे याम्योत्तर वृत्त (खगोलाचे ध्रुवबिंदू व निरीक्षकाचे खस्वस्तिक यांच्यातून जाणारे खगोलावरील वर्तुळ) असून हा खस्थ पदार्थ वा बिंदू आणि हा निरीक्षक आहे. खतर हे मधून जाणारे ऊर्ध्वमंडल क्षितिजाला मध्ये मिळते. उत्तर बिंदू ०° धरून सव्य दिशेने मोजलेले कोनीय अंतर उर किंवा दक्षिण बिंदू ०° धरून सव्य दिशेने मोजलेले कोनीय अंतर दपउर हे चे दिगंश होत. ⇨ उन्नति–दिगंशमापक नावाच्या उपकरणाने दिगंश मोजतात. उन्नतांश व दिगंश ही जोडी ज्योतिष शास्त्रामध्ये सहनिर्देशक (स्थान दर्शविणाऱ्या राशी) म्हणून वापरतात. नौकानयनात दिगंशाचा उपयोग करतात.

पहा : उन्नतांश ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति.

मोडक, वि. वि.