चिंगयुआन : हल्लीचे नाव बाउडिंग. ईशान्य चीनच्या होपे (हबे) या प्रांताची राजधानी. लोकसंख्या सु. ३,५०,००० (१९७०). हे तात्सिंग नदीवरील बंदर पीकिंग-हान्को लोहमार्गावर, पीकिंगच्या नैर्ऋत्येस १४५ किमी.वर असून तेराव्या शतकापासून कारभाराचे व सांस्कृतिक केंद्र आहे. येथे विद्यापीठ व सैनिकी अकादमी आहे. कापड विणणे, औषधे व इतर छोटे उद्योगधंदे येथे असून हे विभागीय व्यापारकेंद्र आहे. शहराभोवतीचा मिंगकालीन (चौदावे ते सतरावे शतक) तट प्रेक्षणीय आहे.

ओक, द. ह.