जांब : महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यामधील अंबड तालुक्यातील गोदावरी नदीतीरावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. लोकसंख्या २,१६९ (१९७१). मनमाड–सिकंदराबाद लोहमार्गावर परतूर स्थानकापासून थोड्याच अंतरावर हे वसले असून श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म येथेच शके १५३० मध्ये चैत्र शुद्ध नवमीस झाला. समर्थभक्त शंकरराव देव यांनी येथील मंदिराचा जीणोद्वार करीपर्यंत हे ओसाड पडले होते. त्यांनी येथे श्री समर्थाची मूर्ती स्थापन केली असून दरवर्षी दासनवमीला मोठा उत्सव होतो. रामदासांसंबंधीच्या अनेक आख्यायिका येथील परिसराशी निगडित आहेत.

 श्री समर्थ मदीर, जांब.

नाईक, शुभदा