डेरा गाझीखान : पाकिस्तानातील आग्नेय पंजाब प्रांतात डेरा गाझीखान या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ठाणे. लोकसंख्या ४७,१०५ (१९७२). हे मुलतनाच्या आग्नेयीस ८० किमी. असून येथे १८६७ मध्ये नगरपालिका स्थापन करण्यात आली. पूर्वी डेरा गाझीखान सिंधू नदीच्या काठी होते परंतु वारंवार येणाऱ्या पुरामुळे १९०० च्या सुमारास त्याचे हल्लीच्या जागी स्थलांतर करण्यात आले. येथे दवाखाना आणि महाविद्यालय आहेत. हे गालिचे व लाकडी खेळण्यांच्या निर्मितीचे मोठे केंद्र आहे.

ओक, द. ह.