डॅरिएल : ( दार्याल). मध्य कॉकेशस पर्वतातील एक खिंड व निदरी. ही रशियाच्या जॉर्जिया प्रजासत्ताकात टेरेक नदीच्या खोऱ्यात असून हिच्या बाजूच्या दरडी सु. १,७९८ मी. उंच आहेत. या खिंडीस क्रिस्तोवी खिंड अथवा कॉकेशियन–आयबेरियन गेट असेही म्हणतात. जवळच काझबेक हे ५,०४२ मी. उंचीचे पर्वतशिखर आहे. या खिंडीतून जॉर्जियन मिलिटरी रोड ११२ किमी. दक्षिणेस टिफ्लिसला जातो.

लिमये, दि. ह.