टामाली : घानाच्या ‘नॉर्दर्न’ विभागाची राजधानी. लोकसंख्या ९८,८१८ (१९७०). हे ॲक्राच्या उत्तरेस ४३२ किमी., श्वेत व्होल्टा नदीच्या पूर्वेस १८३ मी. उंचीवरील मैदानात वसलेले आहे. हे आधुनिक बांधणीचे शहर त्या विभागाचे शैक्षणिक केंद्र असून तेथे साक्षरता प्रसारावर भर दिला जातो. येथे तांदूळ, मका, भुईमूग, वाटाणा, शियानट, लोणी, कापूस इत्यादींचा व्यापार चालतो. हे सडकांचे मोठे केंद्र आहे.
लिमये, दि. ह.