करडापदार्थ : सर्व तरंगलांबींसाठी ज्याची उत्सर्जनक्षमता समान असते असा पदार्थ. एकाच तपमानात व एकाच तरंगलांबीत करड्या पदार्थाने उत्सर्जित केलेले प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) व कृष्ण पदार्थाने (तापवून प्रदीप्त केल्यास सर्व तरंगलांबींचे तरंग उत्सर्जित करणार्या पदार्थाने) उत्सर्जित केलेले प्रारण यांचे गुणोत्तर एकापेक्षा कमी पण ठराविक असते. दृश्य वर्णपटाच्या कक्षेत बर्याच धातूंची उत्सर्जनक्षमता सारखी असते. म्हणून ते तेवढ्या कक्षेत करडे पदार्थ समजले जातात.
पहा : उष्णताप्रारण.
शिरोडकर, सु.स.